चाळीस धारदार तलवारी मालेगावात जप्त – टोळी गजाआड

मालेगाव : मालेगाव शहरातून तब्बल चाळीस धारदार बेकायदा तलवारींसह त्या तलवारी बाळगणा-या टोळीला अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव शहरातील पवारवाडी पोलिस स्टेशन हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल मड्डे नजीक सापळा रचून 1 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिस विभागातर्फे आज तपशीलवार माहिती देण्यात आली.

हॉटेल मड्डे परिसरात सापळा रचून पोलिस पथकाने संशयीत वाहन (एमएच 41.एटी 0107) मधील इसमांवर सिनेस्टाईल पद्धतीने छापा घालण्यात आला. या छाप्यात मोहम्मद आसिफ शाकिर अहमद (27) रा. मर्चट नगर, ,मालेगाव, इरफान अहमद हबीब अहमद (38) रा. मर्चट नगर, मालेगाव, आतिक अहमद सलिम अहमद (28) रा. इस्लामपुरा, मालेगाव यांना जागीच ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश आले.

या टोळीचा साथीदार मोहम्मद मेहमुद अब्दुल राशिद हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध पोलिस पथकाकडून सुरु आहे. अटकेतील तिघा जणांच्या कब्जातुन तब्बल 40 धारदार तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहे.

ताब्यातील तिघांविरुद्ध पवारवाडी पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवारी व्यतिरिक्त या टोळीकडून बजाज ऑटोरिक्षा, मोबाईल फोन असा एकुण 1 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एवढा मोठ शस्त्र साठा मालेगाव शहरात कुठून आला? या तलवारींच्या सहाय्याने कोणते विघातक कृत्य केले जाणार होते? आदी तपास केला जात आहे. फरार झालेला मोहम्मद राशिद हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी मालेगाव शहरातील पोलीस स्टेशनला आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील फौजदार आर.के.घुगे, पोलिस नाईक प्रकाश बनकर, पो.कॉ. भुषण खैरनार, पो.कॉ. पंकज भोये, पो.कॉ. संदिप राठोड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here