जळगाव : देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाने आज भारत बंदची हाक दिली आहे. जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावरील आकाशवाणी चौकात आज ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतक-यांनी आज 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे.