जळगाव : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपनजीक असलेल्या एका संस्थेत नोकरीला असलेल्या कर्मचा-याच्या ताब्यातील मोटार सायकल काही दिवसांपुर्वी अज्ञात चोरट्यांनी गायब केली होती. या चोरीप्रकरणी 1 डिसेंबर रोजी जळगाव शहर पोलिस स्टेशनला चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती.
राजेश भगवान मिसाळकर हे हे गोवींदा रिक्षा स्टॉपनजीक एका संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. त्यांच्या ताब्यातील दुचाकी (MH-19-BB-1880) काही दिवसांपुर्वी त्यांच्या कार्यालयाजवळून चोरीला गेली होती. कुणीतरी नजरचुकीने ती दुचाकी नेली असेल व परत मिळेल या आशेने राजेश मिसाळकर यांनी वाट पाहिली. मात्र आपली दुचाकी चोरी गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शहर पोलीसात गुन्हा दाखल केला.
या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. या प्रकरणी पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांच्या पथकातील पो.उ.नि. रविंद्र गिरासे, पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर अंभोरे, पो.हे.कॉ. शरद भालेराव, पो.हे.कॉ. जितेंद्र पाटील, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, पोलिस नाईक राहुल पाटील आदींनी सापळा रचून दिपक भास्कर सपकाळे (24) धामणगाव जि. जळगाव व इश्वर जगन्नाथ सपकाळे (28) रा.धामणगाव ह.मु. बांभोरी(प्र.चा)ता. धरणगाव यांना ताब्यात घेतले.