स्विफ्ट कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव : विटनेर नेरी रस्त्यावर स्विफ्ट कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी फरार कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष दशरथ पाटील यांचे तालुक्यातील विटनेर – नेरी रस्त्यावर शेत आहे. ते आज सकाळी त्यांच्या ताब्यातील दुचाकीने (एचएच.19.ए.झेड.4377) शेतात जात होते. त्यावेळी मागच्या बाजुने भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने (एलएच.19.सीएफ.2333) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत संतोष दशरथ पाटील हे गंभीर जखमी झाले. दरम्यान स्विफ्ट कार चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

गंभीर जखमी झालेल्या संतोष दशरथ पाटील यांना त्यांचे पुतणे सुरेश पाटील यांनी देवकर मेडीकल कॉलेजमधे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. या प्रकरणी सुरेश पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला स्विफ्ट कार चालकाविरुद्ध रितसर तकार दाखल केली. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here