जळगाव : दोघा दुचाकीस्वार तरुणांनी पादचा-याचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी हद्दीत घडली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला भुषण पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी भुषण पाटील यांनी आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक टिपता आला नव्हता. गुन्हा दाखल करतांना त्यांनी केवळ दोघा दुचाकीस्वारांचे वर्णन नमुद केले होते. पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ.सुधीर साळवे, आसीम तडवी व चेतन सोनवणे यांनी संशयीत आरोपी योगेश जयसिंग चव्हाण(22) रा. नानीबाई हॉस्पीटल जवळ पंचमुखी हनुमान मंदीराजवळ जळगाव आणि विजय बाळू भालेराव (22) सुप्रीम कॉलनी प्रेमाबाई शाळेजवळ जळगाव या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करणे बाकी आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक अमोल मोरे व त्यांचे सहकारी रतीलाल पवार करत आहेत.