जळगाव : शेतीच्या उताऱ्याबाबत काढण्यात आलेली नोटीस परत घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागणी करण्या प्रकरणी बोदवड तहसीलदारांसह मंडळ अधिकारी व तलाठ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयात ताब्यात घेत अटक केली होती.
तिघा लाचखोरांना शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तहसीलदार हेमंत भागवत पाटील (भरडी, ता.जामनेर, ह.मु.बोदवड), मंडळाधिकारी संजय झेंडू शेरनाथ ( प्रभाकर हॉलजवळ, श्रीराम निवास अपार्टमेंट, दुसरा मजला, ब्लॉक नं.6, भुसावळ) व तलाठी निरज प्रकाश पाटील ( हेडगेवार नगर, बोदवड) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तलाठी नीरज पाटील यांच्या वतीने अँड. अश्विनी डोलारे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.