स.पो.नि. संदिप हजारे एसीबीच्या जाळ्यात

On: December 19, 2020 7:05 PM

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक संदिप हजारे यांना एका गुन्ह्यासंदर्भात तडजोडी अखेर 15 हजार रुपयांची लाच घेतांना नाशिक एसीबीच्या पथकाने आज शनिवार 19 डिसेंबर रोजी रंगेहाथ पकड्ले. या घटनेमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे.

काल दुपारी बोदवड येथील महसुलचे तिन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडल्यानंतर लागलीच आज पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने चर्चेला उधान आले आहे. नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक उज्वल पाटील, पो. नि. किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई पुर्ण करण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment