अर्भकास सोडून माता फरार

जळगाव : डांभुर्णी ता. यावल शिवारातील जळगाव – धानोरा रस्त्यावर एका अज्ञात महिलेने अवघे एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक रस्त्याच्या बाजूला सोडून पलायान केल्याची घटना रविवारी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. शेतात काम करणा-या मजुरांच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे अर्भकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथून या अर्भकाला जळगाव नेण्यात आले आहे.

रविवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारातील एका शेतात लाल रंगाची साडी परिधान केलेली महिला व पुरुष दुचाकीने आले होते. त्यांनी शेताच्या बांधावर अर्भकाला सोडून पलायन केल्याची घटना शेतमजूर महिलेसह पिक सरंक्षण सोसायटीचे रखवालदार देविदास सोळुंके यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत डांभुर्णीचे पोलिस पाटील किरण कचरे यांना याबाबतची माहिती दिली.

पोलिसांच्या मदतीने अर्भकास सुरुवातीला यावल ग्रामीण रूग्णालयात व नंतर जळगावला उपचारार्थ नेण्यात आले. पोलिस पाटील किरण कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यावल पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here