कुलगुरुंच्या बदनामी प्रकरणी एनएसयुआय जिल्हाध्यक्षांना नोटीस

जळगाव : भुसावळ येथील प.क. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुदत संपल्यानंतर देखील विद्यापीठाने त्यांची नियुक्ती कायम ठेवली तसेच याप्रकरणी लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण केली असा आरोप एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केल्यामुळे कुलगुरुंची बदनामी झाली. या बदनामीपोटी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्याची नोटीस विद्यापीठाच्यावतीने देवेंद्र मराठे यांना रवाना करण्यात आली आहे.

एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी लाखो रुपये घेऊन विद्यापीठाने मुदत संपल्यानंतर देखील डॉ.मंगला साबद्रा यांना प्राचार्य पदावर कायम ठेवले. अशा आशयाचे पत्रक वर्तमानपत्रात प्रसिद्धसाठी देण्यात आले होते. या प्रकरणात कुलगुरुंसोबत आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता. समाज माध्यमात तशा प्रकारची क्लिप त्यांनी प्रसारीत केली होती. या वृत्तामुळे विद्यापीठाची बदनामी झाली म्हणून विद्यापीठाच्यावतीने प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्या स्वाक्षरीसह देवेंद्र मराठे यांना ॲड. सुशील अत्रे व ॲड. निशांत अत्रे यांच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यापीठाची बदनामी केल्याप्रकरणी देवेंद्र मराठे यांनी लेखी व बिनर्शत माफी मागावी, याशिवाय 1 कोटी रूपयांची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा त्यांच्या विरुध्द दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा या नोटीसीत दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here