गुटखा विक्री प्रकरणी तिघे अटकेत

जळगाव : गुटखा विक्री प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने दिलेल्या माहितीनुसार अजून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

23 डिसेंबर रोजी मध्यरात्री दाखल गुन्ह्यात यासीन उर्फ आज्जु अन्वर शेख (रा. आवेश पार्क डायमंड काॅलनी भुसावळ) यास विमल गुटका विक्री प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी दरम्यान त्याने माहिती दिली. सदर मुद्देमाल त्याने जळगाव येथुन आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने जळगाव शहरातील सिंधी काॅलनी भागातील जे.बी.ट्रेडर्स नावाचे दुकान पोलिसांना दाखवले.

या दुकानातून गुटखा विक्री करणारा मुख्य व्यापारी गिरीष राजेलदास खानचंदानी (40) रा.डी मार्ट जवळ आदर्श नगर जळगाव व त्याचे साथीदार जयेंद्र मनोहरलाल स्वामी (26) रा.आदर्श नगर जळगाव व शेख शकील शेख मासूम (41) रा.खंडेराव नगर जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांचे कब्जातून सुमारे 72,187 रु किमतीचा विमल गुटखा,सागर गुटखा, राज निवास गुटखा व एक T लुना असा एकूण 79,187 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व त्यांचे सहकारी स. पो.नि.कृष्णा भोये, गणेश धुमाळ,अनिल मोरे,मंगेश गोटला,पो. काॅ.विकास सातदिवे,रविंद्र तायडे, प्रशांत परदेशी,चेतन ढाकणे,ईश्वर भालेराव, सुभाष साबळे, प्रशांत सोनार,पो.हे.काॅ.चालक अय्याज सैय्यद आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. याकामी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार आंनदसिंह पाटील, पो.काॅ.योगेश साबळे, तायडे आदींनी त्यांना सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here