जळगाव : कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सुरक्षा रक्षक पुरवण्याचा मक्ता इगल हंटर कंपनी यांना देण्यात आला आहे. परंतु सदर मक्तेदार सुरक्षा रक्षकांवर अन्याय करत असून त्यांच्यावरील अन्याय दूर होण्याची मागणी अँड. कुणाल पवार यांनी कुलगुरु यांचेकडे केली आहे. या पत्रावर एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सामाजिक कार्यकर्ता पियुष पाटील, फार्मसी स्टुडंट अध्यक्ष भूषण भदाणे यांच्या सह्या आहेत.
लॉकडाउन कालावधीत सुरक्षा रक्षकांना घरी रहावे लागले व त्यांना पगार देण्यात आला नाही. रक्षकांचा पीएफ, ईएसआय, बोनस, मेडिकल भत्ता आदी सवलती त्यांना देण्यात आलेल्या नाही. त्यांना नवीन बूट, ओव्हर टाईमची रक्कम देखील देण्यात आलेली नाही. अशा विविध तक्रारींचे पत्र कुलगुरु यांना देण्यात आले आहे.