जळगाव : पारोळा बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत मंगळसुत्र चोरुन नेत पळून जाणा-या दोघा महिलांना सतर्क प्रवाशांनी पाठलाग करत पकडून पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्याचे काम केले.
रविवारी दुपारी तिन वाजेच्या सुमारास शोभा मनोहर महाजन या अमळनेर येथे जाण्यासाठी बसमधे चढण्याच्या प्रयत्नात होत्या. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची मंगल पोत व सोन्याचे मणी असलेली मंगल पोत राधिका चंदर चव्हाण (19) व मीना उर्फ रेखा चव्हाण (65) , अस्नाबाद, ता. भोकरदन) या दोघी लंपास करुन पळ काढत होत्या. हा चोरीचा प्रकार लक्षात येताच शोभा महाजन यांनी आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने दोघींना पकडण्यात यश मिळवले.
याप्रकरणी शोभा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.