जळगाव : भुसावळ येथील शहर पत्रकार संस्थेची बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी दैनिक देशोन्नतीचे भुसावळ विभागीय कार्यालय प्रमुख प्रेम परदेशी यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच पत्रकारदिनी आयोजित कार्यक्रमाचे नियोजन देखील करण्यात आले.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा सरकारी वकील अॅड . नितीन खरे यांच्यासह संजयसिंग चव्हाण, प्रा. श्रीकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती . याप्रसंगी दै. जनशक्ती चे संपादक कुंदन ढाके, पत्रकार सत्तार शेख यांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली
या बैठकीला उज्वला बागुल, राजेश पोतदार, प्रकाश तायडे, संजय काशिव, परशुराम बोंडे, डॉ. जगदीश पाटील, कलीम पायलट, सद्दाम खाटीक, अभिजीत आढाव, सुनील आराक, इम्तियाज शेख, हबीब चव्हाण, कैलास उपाध्याय, कालू शाह, सतीश कांबळे, किशोर शिंपी, आशिष पाटील, शंतनु गचके, राजेश तायडे, अॅड. कैलास शेळके हजर होते. भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रेम परदेशी यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. पत्रकारांसाठी आरोग्य विमा, पत्रकार भवन दुरुस्ती, सभासद नोंदणी, गृहनिर्माण सोसायटी तसेच पत्रकारदिनाचा कार्यक्रम अशा विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रेम परदेशी हे भुसावळ शहर पत्रकार संस्थेची कार्यकारिणी लवकरच पत्रकारदिनी जाहीर करणार आहेत. सुनील आराक यांनी यावेळी आभार व्यक्त केले.