औरंगाबाद : इंडिगोची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सध्या आठवड्यातून तिन दिवस दुपारच्या वेळेत सुरु आहे. आता 8 जानेवारीपासून ही विमानसेवा दुपारऐवजी सकाळी 10.20 वाजता उड्डाण घेणार आहे. त्यामुळे मुंबईला जाणा-या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे.
इंडिगोने प्रवाशांची मागणी लक्षात घेत मुंबईसाठी रोज विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. 8 जानेवारीपासून हे विमान दररोज मुंबईसाठी उड्डाण घेणार आहे. मुंबईसाठी औरंगाबाद येथून दररोज हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहील. हे विमान सध्या मुंबईहून आल्यानंतर औरंगाबादहून दुपारी 12.10 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होते. मुंबईला जाईपर्यंत एक वाजतो.
आठवड्यातून तिन दिवस एअर इंडियाची देखील मुंबईसाठी विमानसेवा सुरु आहे. त्यामुळे आठवड्यातून तिन दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी औरंगाबादला परत येणे प्रवाशांना शक्य होणार आहे.