जळगाव : जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यान परिसरातून अट्टल मोटार सायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याला पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मनोज अशोक मराठे ( रा. पळासखेडे ता. जामनेर) असे मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.
मनोज अशोक मराठे याने जिल्हापेठ, रामानंद नगर, जळगाव शहर, जामनेर व पहुर अशा विविध ठिकाणी तो मोटार सायकली चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची व सध्या जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यान परिसरात फिरत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ. शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांच्या पथकाने त्याच्या पाळतीवर राहुन त्याला ताब्यात घेतले.