सलमान खानच्या कुटूंबातील तिघांविरोधात एफआयआर

मुंबई : अभिनेता सलमान खानसह त्याच्या कुटूंबातील तिघांविरोधात बीएमसीने एफआयआर दाखल केला आहे. सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान या तिघांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई महापालिका प्रशाननाने ही कारवाई केली आहे.

यूकेत नवा कोरोना आढळला आहे. त्यानंतर भारताने कोरोनासंबंधित नियम कडक केले आहेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाते आहे. परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाइन होणे आवश्यक केले आहे. मुंबई महापालिकेने देखील हा नियम लागू केला आहे. त्यानुसार परदेशाहून मुंबईत परत आलेल्या प्रत्येकाला क्वारंटाइन राहणे आवश्यक करण्यात आले आहे.

मात्र सलमानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि पुतण्या निर्वाण खान या तिघांनी या नियमांचे पालन केले नाही. 25 डिसेंबर रोजी तिघे जण यूएई येथून मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना 7 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपले बुकिंग ताज लँड्स हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर ते तिघे परस्पर घरी निघून गेले.

त्यांच्या या बेजबाबदार कृत्यामुळे व क्वारंटाइनचा नियम मोडल्याने साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुंबई महापालिकेकडून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खार पोलीस स्टेशनला या एफआयआरची नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here