जळगाव : मुस्कान – 9 या मोहीमेअंतर्गत जिल्हा पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. सदर मोहीमेदरम्यान मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, रस्त्यातील भिक मागणारी अथवा वस्तु विकणारी मुले-मुली अथवा कचरा गोळा करणारी मुले, धार्मीक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने, सिग्नल, मार्केट या ठिकाणी काम करणारी व भिक्षा मागणा-या 54 मुला मुलींना ताब्यात घेण्यात आले.
या मुला मुलींना हरवलेली मुले समजून त्यांचे फोटो घेवुन, चौकशी करुन त्यांच्या पालकांचा शोध घेण्यात आला. या मुला मुलींच्या पालकांना बालकांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले. बालकांना भिक मागण्यास लावू नये याबाबत समज देण्यात आली. त्यापैकी तिन बालके अनाथ असल्याचे आढळून आले. या तिघा बालकांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली तसेच विपोमनि महीला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग मुंबई यांच्या आदेशानुसार हरवलेल्या बालकांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान – 9 ही शोध मोहीम डिसेंबर महिन्यात राबवण्यात आली होती. या मोहीमेत पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे,अप्पर पोलीस अधिक्षक चद्रंकात गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक यांच्यासह पो.हे.कॉ. दादाभाऊ पाटील, वसंत लिंगायत, कमलाकर बागुल, पो.ना.अविनाश देवरे, किरण धनगर, पो.कॉ. भगवान पाटील, म.पो.कॉ. गायत्री सोनवणे, सर्व पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्प या संस्थेचे सहकारी प्रदिप पाटील, विश्वजीत सपकाळे, योगानंद कोळी यांच्या मार्फत सदर मोहीम राबवण्यात आली.