शोभा घोडके यांचा सन्मान

जळगाव : कुसूंबा बुद्रुक ता. रावेर येथील शोभा घोडके यांचा महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत नुकताच सन्मान करण्यात आला. अंगणवाडी सेविका शोभा नारायण घोडके यांनी कोरोना व लॉकडाऊन कालावधीत स्वतःसह आपल्या परिवाराची काळजी न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकामी केलेल्या कामाबद्दल त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आले.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. त्या कुसूंबा बुद्रुक तालुका रावेर येथील समाजसेवक तथा जे. एस. जावळे विद्यालयाचे सचिव नारायण रामभाऊ घोडके यांच्या पत्नी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here