जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण झाल्यानंतर अवघ्या चार मिनीटात विमान बेपत्ता होण्याची घटना समोर आली आहे. या विमानात एकुण 62 प्रवासी होते. याप्रकरणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.
श्रीविजय एअरचे 182 हे विमान एकूण 62 प्रवाशांना घेऊन या विमानाने उड्डान घेतले होते. इंडोनेशियातील सोशल मीडियावर या घटनेविषयी काही फोटो व्हायरल झाले आहेत. शनिवारी सायंकाळी जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरुन या विमानाने उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटातच या विमानाचा संपर्क नाहीसा झाला. दहा हजार फुट उंचीवर गेलेल्या या विमानाला मोठा अपघात झाल्याची शंका निर्माण झाली आहे.