रावेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ – रावेर तालुक्याच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक छोटेखानी समारंभ निंभोरा स्टेशन येथील कृषी विद्यालयात आयोजीत करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निंभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे, सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल कोंडे आदींची उपस्थिती होती.
आद्य पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशू केअर युनिट मध्ये लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या दहा नवजात शिशूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
स.पो.नि. स्वप्निल उनवणे यांचें स्वागत प्रमोद कोंडे यांनी तर स.पो.नि. देविदास इंगोले यांचे स्वागत प्रा .दिलीप सोनवणे यांनी केले. सुनिल कोंडे यांचें स्वागत प्रदीप महाराज, तालुकाध्यक्ष विलास ताठे यांचें स्वागत दस्तगीर खाटीक यांनी केले. उपाध्यक्ष संतोष नवले यांचें स्वागत विनायक जहुरे, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल यांचें स्वागत पिंजारी यांनी केले. सचिव दिलीप भारंबे यांचें स्वागत योगेश पाटील यांनी तर तालुका संघटक प्रदीप महाराज यांचें स्वागत शेख यांनी केले. सहसचिव जगदिश चौधरी यांचे स्वागत तडवी यांनी केले. संजय पाटील, लक्ष्मण ठाकूर,दस्तगीर खाटीक भिमराव कोचुरे यांची सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाजन यांनी सर्व संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.
रावेर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे व सुनिल कोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी पत्रकार दिनानिमित्त सखोल माहितीपर मार्गदर्शन उपस्थित पत्रकारांना केले. स.पो.नि. स्वप्निल उनवणे साहेब व देविदास इंगोले यांनी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल सचिव दिलीप भारंबे, तालुका संघटक प्रदीप महाराज, सहसचिव जगदिश चौधरी यांच्यासह रावेर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप महाराज यांनी तर सुत्रसंचालन प्रा. दिलीप सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रमोद कोंडे यांनी केले.