ट्रॅक्टर उलटल्याने तिन महिला गंभीर जखमी

(हमीद तडवी)
रावेर : रावेर तालुक्यातील लोहारा येथील सुकी नदी पुलाच्या घाटातून जाणारे ट्रॅक्टर आज दुपारी ब्रेक निकामी झाल्यामुळे उलटले. ट्रॅक्टरमधे बसलेल्या शेतमजूर बचावले असले तरी देखील तिन महिला या घटनेत जबर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोहारा येथील सुकी नदीच्या घाटवळणावर ट्रॅक्टर चढत असतांना एकाएकी ब्रेक निकामी झाले. त्यामुळे ते ट्रॅक्टर मागील दिशेने येवू लागले. त्यात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ते खोल नदी पात्रात जावून कोसळले. सुदैवाने यात प्राणहाणी झाली नसली तरी तिन महिला मात्र गंभीर जखमी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here