कोल्हे हिल्स परिसरातून ट्रॅक्टर चोरट्यास अटक

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाडसे ता. अमळनेर येथून चोरी झालेल्या ट्रक्टरसह चोरट्यास जळगाव शहराच्या कोल्हे हिल्स परिसरातून ताब्यात घेतले आहे. रवी सरजू राठोड(26) मुळ राहणार हिरापुर ता. भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश हल्ली मुक्काम बालाजी पार्क कोल्हे हिल्स परिसर असे अटकेतील ट्रॅक्टर चोरट्याचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील शेतकरी मधुकर नथु कोळी यांच्या मालकीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (एमएच 19 बीजी 5482) हे 15 डिसेंबर रोजी चोरीला गेले होते. त्याबाबत मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सुनिल दामोदरे, प्रदिप पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील व पंकज शिंदे यांनी या तपासकामी कारवाईत सहभाग घेतला. आरोपी सरजू राठोड यास ट्रॅक्टरसह पुढील तपासकामी मारवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here