नवाब मलिकांचा जावई एनसीबीच्या रडारवर

मुंबई : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याने करन सजनानी याच्याकडून विस हजार रुपयात ड्रग्ज खरेदी केल्याचा एनसीबीला संशय आहे. हा व्यवहार गुगल पे वरुन झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी चौकशीकामी समीर खान यास एनसीबी ने बोलावले आहे.

एनसीबीने वांद्रे आणि चेंबूर येथे सोमवारी छापे टाकले होते. या छाप्यात अभिनेत्री दिया मिर्झाची माजी व्यवस्थापक व अन्य दोघा जणांकडून जवळपास दोनशे किलो ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी तिघा जणांना अटक झाली होती. या प्रकरणाचे संबंध आता राज्य सरकारमधील रा. कॉ. चे नेते नवाब मलीक यांच्या जावयापर्यंत गेले असल्याचे समजल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

काही दिवसांपुर्वी मुच्छड पानवाला या दुकानाचा मालक रामकुमार तिवारी यास अटक झाली होती. या दुकानाचे मालक जयशंकर तिवारी आणि रामकुमार या दोघा बंधूंची काही तास चौकशी झाली होती. तिवारी बंधूंच्या दक्षिण मुंबई परिसरातील कँप कॉर्नरवर असलेल्या पानाच्या दुकानात बॉलीवूड मधील हस्ती पान खाण्यासाठी येत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here