जळगाव : धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथे मामाकडे शिक्षण घेणा-या रोशनी योगेश जगताप या विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
रोशनी ही पष्टाने येथे तिचे मामा विजय शांताराम शिंपी यांच्याकडे रहात होती. ती धरणगाव येथे अकरावीच्या वर्गात शिकत होती. ती घरातून ओट्यावर आली व पायऱ्यांवर बसली व तेथेच तिचे निधन झाले. काही वेळाने तिची मामीसह शेजारच्या महिलांनी तिला उठवण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र तीचे निधन झाले होते.
रोशनी तिन वर्षाची असतांनाच तिच्या आईचे निधन झाले होते. तेव्हापासून तिचा सांभाळ तिचे मामा करत होते. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात तिला आणले असता वैद्यकीय अधिका-यांनी तिला मयत घोषित केले. रोशनीच्या पश्चात वडील, एक मोठी बहिण व एक लहान भाऊ आहे.