पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बॅकेत ईडीचा छापा?

पुणे : पुणे – शिवाजीनगर येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर आज शुक्रवारी ईडीचा छापा पडल्याची माहिती समोर येत आहे. या बॅकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी हा छापा असल्याचे म्हटले जात आहे.

यापुर्वी या बॅकेच्या गैरव्यवहार प्रकरणी संचालक आणि विधान परिषदेचे आमदार असलेले अनिल भोसले यांच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी भोसले यांच्यासह इतरांवर बँकेत 71 कोटी 78 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ठपका आहे.

आरबीआयने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे सन 2018-19 चे ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपयांची कमतरता आढळून आली होती. यामुळे बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करत संबंधितांवर फौजदारी कारवाई झाली होती. भोसले यांच्या लॅण्ड क्रुझर, टोयाटा कॅमरी आणि मारुती बलेनो ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांची किंमत सव्वा कोटीच्या जवळपास आहे. त्यांच्या मालकीची अजून दहा – बारा वाहने जप्त करण्याची देखील तयारी करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या अगोदर भोसले यांच्यासह सोळा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे इतर कारवाईला उशीर झाला होता. या गुन्हयासंदर्भात एमपीआयडी न्यायालयात मे महिन्यात चार्जशीट देखील सादर करण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने 30 ते 32 कोटी मुल्य असलेल्या 18 मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यांची जवळपास 170 बॅंक खाती गोठवली आहे. या खात्यात दोन कोटीची रक्कम आहे. या प्रकरणात आतापावेतो 153 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा गैरव्यवहार झाल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here