कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंचे वडील हिमांशू पांड्या यांचे आज शनिवारी निधन झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते.
कृणाल पांड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळत असतांना त्याला वडीलांच्या निधनाचे वृत्त समजले. वृत्त समजताच तो बायो-बबल कवच सोडून तो परतला. या स्पर्धेच्या पुढील सामन्यात तो खेळणार नाही.