कोवीशिल्डच हवी…… कोव्हॅक्सीन घेण्यास डॉक्टरांचा नकार

नवी दिल्ली : देशात आजपासून कोरोना लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. मात्र राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी मात्र आपल्याला ‘कोव्हॅक्सीन’ ऐवजी ‘कोव्हिशील्ड’ लस दिली जावी अशी मागणी एका पत्राद्वारे वैद्यकीय अधीक्षकांना केली आहे.

याबाबत राम मनोहर लोहीया रुग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. डॉक्टरांच्या पत्रानुसार, राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडून कोव्हिशील्ड लसीची मागणी करण्यात आली आहे. पत्रात संबंधीत डॉक्टरांनी म्हटले आहे की “रुग्णालयात आजपासून कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात येत असल्याचे आम्हाला कळाले. मात्र भारत बायोटेकने विकसीत केलेल्या कोव्हॅक्सीनची लस निवासी डॉक्टरांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सीनच्या चाचण्या पूर्ण न झाल्यामुळे डॉक्टरांना या लसीबाबत काही शंका आहेत. यामुळे लसीकरणाचा मुख्य उद्देश साध्य होणार नाही. त्यामुळे कोव्हॅक्सीन ऐवजी कोव्हिशील्ड लस डॉक्टरांना देण्यात यावी असे डॉक्टरांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखील ही लस देण्यात आली. त्याआधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सीन लसीचा उल्लेख ‘बॅकअप’ असा केला होता. गुलेरिया यांच्या या विधानावर भारत बायोटेकच्या संचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

कोव्हॅक्सीनच्या चाचणीमध्येही एम्स कर्मचाऱ्यांनी उत्साह दाखवला नव्हता. कोव्हॅक्सीन चाचणीच्या वेळी एम्समध्ये स्वयंसेवक देखील कमी होते. या चाचणीत सहभागी होण्यासाठी मोबाइल मेसेज पाठविण्याची वेळ आलेली होती. आता तीच लस एम्समधील कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पाठविण्यात आली आहे. एम्समध्ये कोव्हॅक्सीनची चाचणी झालेली असून ती सर्व पातळ्यांवर सुरक्षित असल्याबाबत यापुर्वी जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here