जळगाव : शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील लोणारी मंगल कार्यालयाजवळ मद्यपान करण्यास बसलेल्या तिन मित्रांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे गोळीबार झाल्याचे समजते. या प्रकरणी तिघे आरोपी फरार झाले असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. गोळीबार करणा-या तरुणाचे नाव सनी असे असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे दिलीप भागवत आदींनी आपल्या कर्मचारी पथकासह धाव घेतली. घटनास्थळी बंदुकीची गोळी व काडतुस मिळून आले आहे. काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबार करणा-या सनी या संशयीताच्या पालकांना देखील चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजते. या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा हादरले आहे. भुसावळ शहरात वारंवार गावठी कट्टे कसे येतात हा एक महत्वाचा प्रश्न या निमीत्ताने निर्माण झाला आहे.