जळगाव : सध्या मालेगाव छावणीसह मालेगाव कॅंप पोलिस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव पोलिस पथकाने वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या विस दुचाकी सहा दुचाकीचोरांसह नुकत्याच ताब्यात घेतल्या आहेत. त्यात मालेगाव येथील एका दुचाकीचा समावेश आहे. या माध्यमातून मालेगाव परिसरातील दुचाकीचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धरणगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्याशी “क्राईमदुनिया” ने संपर्क साधला असता त्यांनी मालेगाव येथील चोरीच्या एका दुचाकीचा समावेश असल्याचे स्पष्ट केले आहे.