जळगाव : ग्रामपंचायत निवडणूकीत विजय झाल्याच्या वादातून तालुक्यातील उमाळा येथे लाकडी काठीने मारहाण करण्यासह तलवारीच्या बळावर दहशत निर्माण केल्याप्रकरणी चौदा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज सकाळी साडे नऊ वाजता उमाळा गावाच्या गावठान जवळ भिमराव झिपरु पाटील व राजेंद्र बाबुराव पाटील तसेच संदिप कैलास बि-हाडे असे तिघे जण उभे होते. त्यावेळी शेखर नाना पाटील हा गावातून आला. त्याने राजेंद्र पाटील यास म्हटले की तु माझ्याकडे खुनशी नजरेने का बघतो. त्यावर राजेंद्र पाटील याने शेखर पाटील यास म्हटले की मी तुझ्याकडे खुनशी नजरेने का बघू. या बोलण्याचा शेखर पाटील यास राग आला. त्यावेळी त्याच्या आवाजामुळे जमाव हातात लाकडी काठ्या घेवून आला. त्यावेळी रघुनाथ चव्हाण याने लाकडी काठी भिमराव चव्हाण याच्या डोक्यात व डाव्या हातावर मारली. त्यामुळे भान हरपलेल्या भिमराव चव्हाण यास लोकांनी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखले केले.
प्रकाश साहेबराव चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला राजु पाटील, शंकर पाटील, रघुनाथ पाटील, संजय पाटील, युवराज चव्हाण, नामदेव चव्हाण, किरण चव्हाण, नितीन चव्हाण, भिमराव पाटील, समाधान पाटील, किरण पाटील, सुमीत धनगर, पंढरी धनगर, सुरेश धनगर आदींविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील राजू पाटील याच्याविरुद्ध हातात तलवार घेत दहशत माजवल्याचा आरोप आहे.