प्रजासत्ताकाचा समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार

जळगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय जळगाव येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिलह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, आई-वडील, कोरोनायोध्दे जसे-डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेले काही नागरीक तसेच जळगाव शहरातील मर्यादित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांनी सहभागी होण्यासाठी 26 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 8.30 ते 10.00 दररम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध-शासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी अथवा 10.00 वाजेनंतर करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. प्रभात फेऱ्या काढण्यात येऊ नये. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here