भारत – ऑस्ट्रेलिया संघाच्या दरम्यान झालेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयाचा नायक ठरलेल्या रिषभने सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 328 धावांचे लक्ष गाठत 89 धावांची आक्रमक खेळी केली.
सामना संपल्यानंतर रिषभने “हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण असल्याचे म्हटले आहे. मला आनंद होतो की जेव्हा मी खेळत नव्हतो तेव्हा देखील सर्व कोच व सर्व सहकाऱ्यांनी मला साथ दिली आहे. ही मालिका स्वप्नवत ठरली असल्याचे रिषभने म्हटले आहे.
रिषभने सामन्याच्या पाचव्या दिवशी 138 बॉलमधे 9 चौकार आणि 1 षटकारासह 89 धावांची आक्रमक खेळी केली. रिषभच्या या खेळीमुळेच भारतीय संघाला 328 धावांचे लक्ष पार करण्यात यश आले आहे.