लिव्ह इन रिलेशनशीपबाबत निश्चित व्याख्या नाही. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार आपल्या नातेसंबंधांना लिव्ह इन रिलेशनशीपच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसुन येते. अशा लोकांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणा-यांचे प्रमाण सध्या वाढले आहे. काही जण घटस्फोट न घेता एखाद्या जोडीदारासोबत रहात आहेत. त्याला देखील लिव्ह इन रिलेशनचे नाव दिले जात आहे. उत्तर प्रदेशातील एक महिला घटस्फोट न घेता तिच्या दुसऱ्य़ा जोडीदारासोबत रहात होती. तिने तिच्या या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप अशी मान्यता मिळण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने तिची ही याचिका फेटाळली. घटस्फोट न घेता एखाद्या परपुरुषासोबत राहणे हा गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ज्यांचे कुणासोबत वैवाहिक आयुष्य नाही अशा जोडीदारांनाच लिव्ह इन रिलेशनमध्ये राहता येईल असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे समाजाच्या दृष्टीने अनैतिक असले तरी बेकायदा नाही. हे संबंध विवाहसदृश असावेत अशी न्यायालयाची भुमिका आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं लिव्ह इन रिलेशन मधील कायदेशीर गुंतागुंत काही प्रमाणात कमी झालेली आहे.