जळगाव : अखिल भारतीय ब्रम्ह महाशिखर परिषदेच्या गोलमेज परिषदेचे आयोजन 22 जानेवारी रोजी ब्राम्हण सभा जळगाव येथे करण्यात आले आहे. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत या गोलमेज परिषदेची वेळ राहणार आहे. या परिषदेला भुसावळ येथील अॅड. अश्विनी डोलारे यांची या परिषदेत उपस्थिती राहणार आहे.
सामाजिक दृष्ट्या सरकारकडून ब्राम्हण समाजाच्या प्रलंबीत मागण्या मान्य करुन घेण्यासाठी या परिषदेत चर्चा केली जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात अखिल भारतीय ब्रम्ह महाशिखर या संस्थेची केंद्र व राज्य सरकार यांचा संयुक्त पाठपुरावा करण्याकामी स्थापना करण्यात आली आहे. त्या निमित्ताने जळगाव येथील ब्राम्हण सभेत या परिषदेचे 22 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ब्राम्हण समाजासमोर असलेल्या समस्या यासह विविध विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.