उमाळा येथील मारहाण प्रकरणी पाच जणांना चार दिवस कोठडी

जळगाव : ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून तालुक्यातील उमाळा येथे झालेल्या मारहाण प्रकरणी चौदा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू बाबुराव पाटील, सुरेश अर्जुन धनगर, किरण भीमराव पाटील, राजू बाबूराव पाटील, सुमित निंबा धनगर (सर्व रा. उमाळा) यांना काल रात्री अटक झाली होती. अटकेतील सर्वांना आज न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. अटकेतील पाचही जणांना 24 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अमोल मोरे, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, गफ्फार तडवी, रतिलाल पवार, सुधीर साळवे, चेतन सोनवणे, सचिन पाटील आदींनी या प्रकरणी कारवाई केली आहे. उर्वरित संशयीत आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here