कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यावेळी दहावी आणि बारावीच्या परिक्षा थोड्याफार प्रमाणात लांबणीवर पडल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावीच्या परिक्षांची तारीख जाहीर केली आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस घोषित केला जाणार आहे. इयत्ता दहावीच्या परिक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. या परिक्षांचा निकाल ऑगस्ट 2021 च्या अखेरीस घोषित होईल.