पुणे : कोव्हीशिल्ड या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इंस्टीटयूटला लागलेल्या आगीने खळबळ उडाली आहे. पुणे येथील मांजरी भागातील इमारतीत ही आग लागल्याचे वृत्त आहे.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या या आगीवर नियंत्रण आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. डीसीजी लसीचे उत्पादन करणा-या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीचे वृत्त समोर येताच नागरिकांनी गर्दी केली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या आगीच्या भक्ष स्थानी कुणी कर्मचारी अडकले आहेत काय याचा देखील शोध सुरु आहे.