जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या गस्ती पथकाने मध्यरात्री भरधाव वेगातील ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली. ट्रक चालक पवन देवीदास नन्नवरे व क्लिनर श्रीराम गणपत साळुंखे (दोघे रा. बांभोरी – धरणगाव) या दोघांविरुद्ध रितसर कारवाई करण्यात आली आहे. वाळूने भरलेला दिड ब्रास रेतीसह ट्रक ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास बाजारपेठ पोलिस करत आहेत. या कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश गोटला, पो.कॉ. इश्वर भालेराव, होमगार्ड अकबर गवळी, प्रितम किर्तीकर यांनी सहभाग घेतला.