जळगाव : अमळनेर येथील तिघा मोटार सायकल चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून पुढील तपासकामी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तिघे मोटार सायकल चोरटे अमळनेर येथीलच रहिवासी असून त्यांच्याकडून मोटार सायकल चोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमळनेर शहरातील काही तरुण मोटार सायकली चोरुंन त्या कमी किमतीत विक्री करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी आपले सहकारी सहायक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे, प्रविण मांडोळे, दिपक शिंदे, उमेशगिरी गोसावी व मुरलीधर बारी यांना रवाना केले होते.
सदर पथकाने अमळनेर शहरात ठाण मांडून गुप्त रितीने माहिती काढत अजय इश्वर भिल (19) रा. फकीरवाडा ताडेपुरा अमळनेर, रवी तात्या वैदू (19) वैदूवाडा ताडेपुरा अमळनेर, सनी अनिल माचरे (19) ताडेपुरा अमळनेर या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीअंती त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. तिघांनी अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतून हिरो कंपनीची मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली. तिघांना मोटारसायकलसह अमळनेर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.