दिल्ली : दिल्ली येथे स्फोट झाल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले आहे. दिल्ली येथील अब्दुल कलाम रस्त्यावरील इस्त्रायल दुतावासानजीक झालेल्या स्फोटाचा आवाज खुप अंतरावर गेल्याचे म्हटले जात आहे. या स्फोटामुळे वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. या स्फोटात प्राणहाणी झालेली नाही. हा स्फोट 5 वाजून 5 मिनीटांनी झाल्याचे सांगितले जात आहे.