जळगाव : गिरणा नदी किनारी जलाराम मंदिरानजीक महामार्गालगत निसर्गरम्य वातावरणातील चेतना व्यसनमुक्ती केंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज मोठ्या उत्साहात झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या भुमिकेत प्रसिद्ध संमोहन तज्ञ असलेले सागर कोळी उपस्थित होते. सागर कोळी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
समाजहितासाठी मद्यपानास विरोध करणा-या बापूंसाठी या प्रसंगी दोन मिनीटांचे मौन पाळण्यात आले. बापूजींनी घालुन दिलेल्या शिकवणीप्रमाणे मद्यपानास तिलांजली वाहण्याची रुग्ण मित्रांनी यावेळी प्रतिज्ञा केली.
या प्रसंगी उपस्थित राजेंद्र दौड यांनी रुग्ण मित्रांना “माझे सत्याचे प्रयोग” या पुस्तकातील काही भाग रुग्ण मित्रांसमोर सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी “आम्ही सत्याचे आचरण करु” अशी सर्वांना शपथ दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिजित देशमुख, दीपक पाटील, मेघराज बोरसे, संतोष करंगे, हेमंत देवरे, भोला पाटील, प्रतीक सोनार आदींचे अनमोल सहकार्य लाभले.