लेवा पाटीदार सोशल फाउंडेशन’तर्फे आजपासून क्रिकेट स्पर्धा

जळगाव : लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल ट्रॉफी 2021 क्रिकेट स्पर्धांचे सागर पार्क मैदानावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक चंदन कोल्हे यांनी सोमवारी सायंकाळी सागर पार्क येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके, अभिजीत महाजन, अ‍ॅड. पुष्कर नेहेते,अमोल धांडे, भूषण बढे, हितेंद्र धांडे, लिलाध खडके, स्वप्नील नेमाडे, अक्षय कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अ‍ॅड. केतन ढाके यांची निवड केली आहे. स्पर्धेचे उद्घाटन दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता व्यवसायिक भागवत भंगाळे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत जळगाव शहरातील 12 व ग्रामीणचे 12 संघ सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here