आजचे राशी भविष्य (3/2/21)

मेष : धार्मिक कामात सहभाग घ्याल. जुनी येणी वसुल होतील.

वृषभ : रखडलेली शासकीय कामे मार्गी लागतील. यंत्राचा वापर जपून करावा.

मिथुन : साधारण दिवस राहील. बेतापेक्षा जास्त धाडस करु नये.

कर्क : कठोर शब्द शक्यतो टाळावे लागतील. पाहुण्यांचे आगमन होवू शकते.

सिंह : मेहनतीचे फळ मिळेल. यशाचे कौतुक देखील होईल.

कन्या : घरगुती दुरुस्तीची कामे करावी लागतील. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. 

तुळ : वेळच्या वेळी वैद्यकीय सल्ल्याने आरोग्य जपावे.

वृश्चिक : तत्वे बाजूला ठेवून व्यवसायात कामे करावी लागतील. आर्थिक नियोजन कोलमडू शकते.

धनु : उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. आपल्या गुणांचे कौतुक होईल.

मकर : पारंपारिक व्यवसाय करणा-यांना चांगला लाभ होईल. अडचणीत जेष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल.

कुंभ : विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. काही जणांना आर्थिक चणचण भासेल.

मीन : कामाचा ताणतणाव चेह-यावर जाणवेल. प्रवास टाळणे हिताचे राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here