मुंबई : मायानगरी मुंबई येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या 37 व्या मजल्यावरील रुममधे कपडे बदलत असतांना एका अभिनेत्रीसोबत गैरप्रकार घडला. या प्रकरणी दिलेश्वर महंत या संशयीत आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध एन.एम.जोशी मार्ग पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत अभिनेत्री एका वेब सिरीजचे चित्रीकरण आटोपून दक्षीण मुंबईमधील हॉटेलमधे कपडे बदलण्यासाठी आली होती. त्यावेळी दिलेश्वर महंत याने तिला घट्ट पकडून ठेवत तिच्यासोबत गैरवर्तन केले. अभिनेत्रीने आरडाओरड करुन हॉटेल कर्मचा-यांना बोलावले. कर्मचा-यांनी त्याला पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध मुंबईच्या एन.एम.जोशी मार्ग पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.