मुंबई : मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याच्या आरोपाखाली पत्रकार अर्णब गोस्वामी व त्यांच्या पत्नीविरुद्ध सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई पोलिसांच्या वतीने सदर तक्रार दाखल केली आहे. भा.द.वि. 499, 500 व 501 नुसार हा दावा दाखल करण्यात आला आहे.
टीआरपी घोटाळ्यातील संशयीत पार्थ दासगुप्ता यांचे नाव आता मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात देखील आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.