एल एल रावल यांनी नाबार्ड,महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय,पुणे मुख्य महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला

लकुलिश एल रावल

श्री लकुलिश एल रावल यांनी दिनांक 01 जुलै 2020 पासून नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. नाबार्ड, ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील एक सर्वोच्च स्तरीय विकास बँक आहे.

श्री रावल 1985 साली नाबार्ड मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना राज्य प्रकल्प निधि, कॉर्पोरेट नियोजन,वित्तीय समावेशन, सूक्ष्म ऋण नवोन्मेष, व्यवसाय इनिशीएटिव्ज, नॅबकॉन्सच्या माध्यमातून सल्लागार सेवा, बँकिंग आणि वित्तीय तंत्रज्ञान आदींसारख्या विविध क्षेत्राचा 35 वर्षाचा समृद्ध अनुभव आहे.

त्यांनी नाबार्डच्या अहमदाबाद, बेंगळुरू, जयपुर, मुंबई, गुवाहाटी आणि पुणे अशा विविध कार्यालयात कार्य केले आहे. ते विज्ञान विषयात पदव्युतर पदवीधारक आहेत आणि त्यांनी संगणक अनुपयोगामधे पदविका प्राप्त केली आहे.

याबरोबरच त्यांनी वित्त क्षेत्रात एमबीए केले आहे आणि त्यांनी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग एंड फायनॅन्स मधून सीएआयआयबी देखील केले आहे.मुख्य महाव्यवस्थापक म्हणून पदोन्नती होण्याआधी ते नाबार्डच्या पुणे कार्यालयात महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here