केंद्राचा सातवा वेतन आयोग – महागाई भत्त्यात होणार वाढ?

On: February 8, 2021 4:30 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचा-यांचे लक्ष सध्या महागाई भत्त्याकडे लागले आहे. या वाढीव महागाई भत्त्याची घोषणा काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महागाई भत्ता अर्थात डीएमध्ये वाढ झाल्यास जवळपास पन्नास लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीधारक कर्मचारी वर्गाच्या आनंदात भर पडणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सदर वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना सध्या सतरा टक्के महागाई भत्ता मिळत असून त्यात चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून 2021 पर्यंत महागाई भत्त्याची घोषणा होवू शकते. जून महिन्यापासून पगारात व पेन्शनमधे वाढ होवू शकते. केंद्र सरकारच्या कर्मचारी वर्गाच्या मुलभुत पगार अथवा पेन्शन विचारात घेवून डीएची घोषणा केली जाणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने अगोदरच म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment