मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आता उद्योगपती गौतम अदानी गृपकडे गेले आहे. अदानी एअर पोर्ट होल्डींग लि. ने दोन परदेशी कंपन्यांकडून मुंबईच्या एमआयएएल अर्थात मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमीटेड मधील अजुन 23.5 % हिस्सा विकत घेतला आहे. एकुण 1685.20 कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला.
जीव्हीकेसोबतचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अदानी ग्रुपची एमआयएएलमधील एकूण हिस्सेदारी 74 टक्के होणार आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने सोमवारी एअरपोर्ट्स कंपनी साऊथ आफ्रिका आणि बिड सर्व्हिसेज डिव्हीजन (मॉरिशस) लिमिटेड या विदेशी कंपन्यांकडून 1685.2 कोटींना 23.5 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली. अदानी इंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने एमआयएएलमधील 28.20 कोटी शेअर्स खरेदी केले.