पुणे : आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत शनिवारी सायंकाळी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात एकाने विषारी द्रवपदार्थ प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन करणा-यास रुग्णालयात दाखल केले आहे. नवनाथ थोरात असे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणा-याचे नाव असून त्याच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक संदीप पवार करत आहेत.
नवनाथ थोरात याच्याविरुद्ध मंचर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचा त्याचा आरोप आहे. या आरोपाला अनुसरुन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.