पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असतांनाच आता 15 फेब्रुवारीपासून घरगुती गॅसची किंमत पन्नास रुपयांनी महागणार आहे. सामान्य जनतेच्या खिशाला या वाढीव किमतीमुळे फटका बसणार आहे.
पेट्रोल व डिझेलचे दर जवळपास शंभर रुपयांच्या टोकाला पोहोचले आहे. अशातच आता सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढल्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. पेट्रोलसह डिझेलवर केंद्रासह राज्याने करवाढ केल्यामुळे महागाई पेटून उठली आहे. तशातच आता घरगुती गॅसच्या किमती वाढल्या आहेत.